About Shikshak Bank Kolhapur.

शिक्षक संघाचे 18 संचालकांचे बहुमत असलेले पॅनेल प्राथमिक शिक्षक बँकेची व्यवस्थापनाची धुरा सांभाळत आहे. बँकेने आजपर्यंत राष्ट्रीय व जिल्हास्तरावरील अनेक विभागात विविध पारितोषिके प्राप्त केली आहेत.

1. कर्मचारी बांधवांमध्ये शिस्तः बँकेतील कर्मचा-यांना शिस्तीमध्ये बँकेचे हित व वैभव आहे याची जाणिव करुन दिली. बँक वाचली तर कर्मचा-याचे संसार आहेत याची करुन दिलेली जाणीव बँकेच्या प्रगतीस कारणीभुत ठरली. सभासद व ठेवीदारांचे काम कमीत कमी वेळेत पूर्ण करुन त्यांना उत्तमोत्तम सेवा देणे हेच आपले कर्तव्य आहे याची जाणीव झालेने कर्मचारी इतस्ता न भरकटता बँकेच्या हिताच्या कामात गुंतवूण ठेवले.

2. एन.पी.ए. 15.15 टक्केवरुन शुन्य टक्केवर आहे.

3. ठेवीः ठेव वाढीचे प्रमाण गत पाच वर्षात मोठ्या प्रमाणात आहे, हे म्हणजे बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या पारदर्शक कामाची पोहोच आहे.

4. कर्जवाटपः सध्याच्या काळात कर्ज वाटपाचेही प्रमाण दुप्पट झाले आहे.

5. सभासदांना मोफत निवासगृह वापरणेची सुविधा.

6. संपूर्ण कर्जमाफीः सभासद, कर्जदार जामिनदार यांच्या हितासाठी बँकेना सभासदांसाठी संपूर्ण कर्जमाफी योजना सुरु केली आहे.यामुळे सभासदाच्या हयाती पश्चात त्यांच्या कुटुंबाची वाताहात होणार नाही याची जबाबदारी बँकेने घेतली आहे.

7. समारंभ खर्चास फाटाः खर्चात कपात व्हावी,सभासदांना चांगल्या प्रकारे डिव्हीडंड मिळावा यासाठी बँकेने सर्व प्रकारच्या समारंभासाठीच्या खर्चात कपात केली आहे, सर्व समारंभ साध्या पद्धतीने साजरे करुन भपकेबाज खर्चावर मर्यादा आणल्या.

8. कारभारातील पारदर्शकता: म्हणून बँकेचे मोठे खर्च हे जनरल सभेत मंजूर करुन केले जातात ज्या अन्वये होणा-या खर्चाची पारदर्शकता सर्व सभासदामध्ये राहील.

Top
  • Follows us our servcies